Pune Cyber Crime | Union HM अमित शहा, CM एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी हिंदु एकता ग्रुपवर अश्लिल मजकूर; सायबर पोलिसांनी केला बदनामीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविषयी बदनामीकारक व अश्लिल मजकूर फेसबुकवरील (Facebook) हिंदू एकता ग्रुप (Hindu Ekta Group) वर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) बदनामीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी भाजपचे नेते (BJP Leader) विनित भरतकुमार बाजपेयी Vineet Bharatkumar Bajpai (वय ३९, रा. धानोरी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१/२२) दिली आहे. त्यानुसार हिंदू एकता ग्रुपवर पोस्ट करणारे रामदास शिर्के (Ramdas Shirke) याच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Cyber Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर हिंदू एकता नावाने ग्रुप आहे. त्यात नाट्यरुपाने काही संवाद देण्यात आले आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवाद देण्यात आले आहेत. त्यात आक्षेपार्ह आणि अश्लिल मजकूर देण्यात आला आहे. मान्यवरांच्या घटनात्मक व राजकीय प्रतिष्ठितांचे लौकिकास बाधा येईल, असा मजकूर आहेत. त्यामुळे बदनामी करणारा मजकूर प्रसारित केल्याने गुन्हा दखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील (Senior Police Inspector Minal Supe Patil) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Obscene text on Hindu Ekta Group about Union Home Minister Amit Shah,
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis;
The Pune cyber police filed a defamation case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा