Pune Crime | संतापजनक ! कंपनीतील महिलेसोबत अश्लील चाळे, असिस्टंट मॅनेजरला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी कंपनीतील असिस्टंट मॅनेजरला (Assistant Manager) चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. हा प्रकार 12 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत म्हाळुंगे येथील व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. (Verok Engineering LTD) या कंपनी घडला आहे.
जाक्सन अरुण अल्हाट Jackson Arun Alhat (वय-34 रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय कामगार महिलेने गुरुवारी (दि.27) म्हाळुंगे पोलीस चौकीत (Mahalunge Police Chowki) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. या कंपनीत काम करतात.
काम करत असताना आरोपी असिस्टंट मॅनेजर याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन फिर्यादी यांना मोबाईलवर अश्लील मेसेज (Pornographic Messages) पाठवले.
तसेच त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग (Molestation) केला.
तसेच हा प्रकार कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | obscene things with a working woman assistant manager arrested in pimpri chinchwad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update