Pune Crime | मंगळवार पेठेतील कोंबडीपुलावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; 4 जणांवर गुन्हा, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रात्री झालेल्या भांडणाचा (Dispute) वचपा काढण्यासाठी चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण (Beating) केली. तसेच एकावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले. ही घटना मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) कोंबडीपुलावर बुधवारी (दि. 30 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Pune Police) एका सराईत गुन्हेगारासह (Criminal) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करुन एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

हर्षल सलीम शेख उर्फ ओंकार विनोद मासाळ Hershal Salim Sheikh alias Omkar Vinod Masal (वय-22 रा. रेल्वे भराव वस्ती, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश विष्णू कांबळे (वय-26 रा. मंगळवार पेठ), रोहीत उर्फ नट्या कांबळे, सागर खैरमोडे, बाबु अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलेश कांबळे याला अटक केली आहे. सागर खैरमोडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल आणि त्याचा मित्र बाबू हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हर्षल आणि बाबूला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर बाबु शेख याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने हर्षल याच्या उजव्या हाताच्या मनगटावर व डोक्यात पाठीमागून वार केले. यामध्ये हर्षल गंभीर जखमी झाला आहे. तर निलेश कांबळे याने हर्षलचा मित्र बाबू याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. यानंतर आरोपी शिवीगाळ करत पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | On Tuesday, a young man was stabbed on the kombdi pull in mangalwar peth; 4 arrested, one arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TV AC Mobile Price Hike | 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा भार ! टीव्ही, एसी, Mobile महागणार; तर CNG वाहनधारकांना दिलासा

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी