Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा भागात एका ज्येष्ठ व्यक्तीला सायबर चोरट्यांनी फसवल्याची (Pune Crime) घटना उघडकीस आली आहे. बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला साडेअकरा लाखांना ऑनलाइन गंडा घातला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार (Pune Crime) दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांची खासगी बँकांत दोन खाती आहेत. चोरट्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला आणि बँक खाते अद्ययावत करायचे आहे असे सांगितले. तसेच बँक खाते अद्ययावत न केल्यास त्यांना व्यवहार करता येणार नाहीत, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना एक लिंक पाठवली. लिंक उघडून ऐनी डेस्क अ‍ॅप उघडण्यास सांगितले. या अ‍ॅपमध्ये ज्येष्ठाला बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. त्यामुळे चोरट्यांनी ज्येष्ठाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने 11 लाख 57 हजार 692 रुपये लांबवले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिसांना या प्रकरणी अज्ञातांविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Web Title :- Pune Crime | one and a half lakh rupees fined to the senior cyber thief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update