Pune Crime | पुण्यात खडक आणि चतु:श्रृंगी परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीमध्ये आईसोबत पायी चालत जाणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महादेव फुलचंद साबळे (Mahadev Fulchand Sable) याला पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत एका महिलेचा विनयभंग करुन महिलेच्या 15 वर्षाच्या मुलीला अश्लील भाषेत (Obscene Language) शिवीगाळ केली. याप्रकरणी शिवा उर्फ शिवम दिलीप कांबळे (Shiva alias Shivam Dilip Kamble) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

खडक पोलीस ठाण्यात 16 वर्षाच्या पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिासांनी आयपीसी 354ड पोक्सो अ‍ॅक्टनुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करुन महादेव साबळे (वय-20 रा. दांडेकर पुल झोपडपट्टी) याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास गुरुवार पेठेत (Guruwar Peth) घडला. पीडित तरुणी तिच्या आईसोबत रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी आरोपीने पाठिमागून येऊन अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तोटेवार (PSI Totewar) करीत आहेत.(Pune Crime)

 

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिवा उर्फ शिवम कांबळे (वय-26 रा. वडारवाडी) याच्यावर आयपीसी IPC 354, 509, 323, 504, 506, पॉक्सो अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला.

पीडित महिला आणि त्यांची 15 वर्षाची मुलगी फिर्य़ादी यांच्या काकूच्या घरुन येत होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडे पासून काहीतरी वक्तव्य केले.
त्याचा जाब विचारला असता आरोपीने फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
त्यावेळी फिर्यादी यांच्या मुलीने शिवीगाळ का करतो असे विचारले असता तिला देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करुन धमकी (Threat) दिली.
तसेच फिर्यादी यांच्यासोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | One arrested for molestation case fir in Khadak and Chaturshringi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP On CM Uddhav Thackeray | ‘हिटलरही असाच अहंकारी होता’, भाजपने कार्टुनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

 

Gunaratna Sadavarte | अखेर गुणरत्न सदावर्ते यांची 18 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका; तुरुंगातून बाहेर येताच…

 

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी