Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रॉन अंमली (Mephedrone Drug) पदार्थ विक्रिसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी ठाणे (Thane) येथील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 32 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) ही कारवाई मंगळवारी (दि.5) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भंडारा डोंगराकडे  जाणाऱ्या तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) कमानीजवळ रस्त्याच्या (Pune Crime) कडेला केली.

नदीम इनायत पटेल Nadeem Inayat Patel (वय-33 रा. रशिद कंपाऊंड, सैनिकनगर, फ्लॅट नं.7, मुंब्रा-Mumbra, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या (Crime Branch) शस्त्र विरोधी पथकाचे (Anti-Arms Squad) पोलीस हवालदार खेमा वडेकर Police Constable Khema Wadekar (वय-37) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदवडी गावच्या (Sudwadi Village) हद्दीत भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या तुकाराम महाराज कमानीच्या जवळ रोडच्या कडेला एक सेलोरो Celerio (एमएच 04 के.एल.8762) गाडी संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी गाडीमधील आरोपी पटेल याची झडती घेतली असता त्याच्याकडे 27 लाख 20 हजार रुपये किमतीचे 272 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने मेफेड्रॉन विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे समोर आले. पोलिसांनी कार, मेफेड्रॉन, दोन मोबाईल असा एकूण 32 लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | One arrested for possession of mephedrone, Rs 32 lakh seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!