Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून (Health Department Recruitment Fraud Case) त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) करत असून या प्रकरणात पोलिसांनी एकाला औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.1) करण्यात आली. (Pune Crime)

 

विजय प्रल्हाद मुऱ्हाडे Vijay Pralhad Murhade (वय 29, रा. नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर (Smita Karegaonkar) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फुटलेल्या पेपरच्या स्क्रीन शॉट्समध्ये विजय मुऱ्हाडे याचे नाव होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून त्याचा शोध घेऊन आज त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकारामुळे शासनाची आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. (Pune Crime)

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Cyber Police Senior Inspector D.S. Hake) यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु केला. त्यावेळी आरोपी विजय मुऱ्हाडे याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला औरंगाबाद येथून अटक केली. त्याला अटक केल्यानंतर तो इतर व्यक्तींची नावे सांगत होता. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु असून आरोपींची साखळी शोधण्यात येत आहे. तसेच हा पेपर आरोपींना कोणी दिला, त्याने ते कोणाकोणाला पाठले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत असल्याचे हाके यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime | One arrested from Aurangabad by Pune Cyber Police in Health Department recruitment paper rupture case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 903 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

DRDO Recruitment 2021 | 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! ‘डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया’मध्ये भरती; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी