Pune Crime | लोणी काळभोरमध्ये अमलीदार्थ विक्री प्रकरणात एकास अटक; सहा किलो गांजा जप्त

पुणे : Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor, Pune) परिसरात गांजा (Marijuana) विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) पकडले. त्याच्याकडून सहा किलो गांजा आणि दुचाकी असा 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Pune Crime)

चंद्रकांत सुरेश पवार Chandrakant Suresh Pawar (वय 21, सध्या रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. तिंत्रज, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे लोणी काळभोर भागात गस्त घालत होते. त्या वेळी एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पवारला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. पवार याच्याकडून दुचाकी आणि 6 किलो 107 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. (Pune Crime)

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक आयुक्त गजानन टोम्पे (Assistant Commissioner Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक निरीक्षक शैलजा जानकर
(Assistant Inspector Shailaja Jankar), मनोज साळुंके, विशाल दळवी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.

Web Title :- Pune Crime | One arrested in case of illegal sale of butter in Kalbhor; Six kilos of ganja seized crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Shahajibapu Patil | ‘पवारांचे जोडे उचलूनही काका-पुतण्याने मला 20 वर्षे कोंडून ठेवले आणि आता…’, शहाजीबापू पाटील यांची तुफान फटकेबाजी

Shivsena VS Shinde Group | रात्रीस खेळ चाले! निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मध्यरात्री ई-मेल, वेळेपूर्वीच दिले 800 पानांचे उत्तर, देसाई यांची माहिती