Pune Crime | बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरून तिघांनी एका व्यक्तीला लाकडी बांबूने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच बांबू डोक्यात मारुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.22) रात्री सातच्या सुमारास कात्रज (Katraj) येथील शिवशंभोनगर शारदा शांतिनिकेतन बिल्डिंग (Sharda Shantiniketan Building) मध्ये घडला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

धर्मेंद्रकुमार पांडे (Dharmendra Kumar Pandey) असे जखमी (Injured) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत ज्योती धमेंद्रकुमार पांडे (वय-30) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहीत मिश्रा (Rohit Mishra), ब्रिजेश तिवारी (Brijesh Tiwari), संगीता तिवारी Sangeeta Tiwari (सर्व रा. शारदा शांतिनिकेतन बिल्डींग, गल्ली नं. 4, शिवशंभोनगर, कात्रज) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. मंगळवारी संध्याकाळी फिर्यादी यांच्या घराच्या बाल्कनीमधून शूज (Shoes) खाली पडला. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांचे पती धमेंद्रकुमार यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर रोहित मिश्रा याने लाकडी बांबू धमेंद्रकुमार पांडे यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच आरोपींनी पांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | One beaten to death for falling shoes from balcony, three arrested Bharti Vidyapeeth Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | राज्य सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी

 

Sanjay Raut | ‘एक पुतीन दिल्लीत बसलेत जे…’; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी तुलना करत केली जहरी टीका !