Pune Crime | खळबळजनक ! दोन मित्र आमने-सामने; एकाने चालवले हत्यार, दुसऱ्याकडून 3 राऊंड फायर; एकजण जागीच ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मावळ तालुक्यातील (Maval) आढले खुर्द येथील एक खळबळजनक घटना (Pune Crime) समोर आली आहे. दोनच दिवसाआधी झालेल्या भांडणातून दोन मित्र आमने-सामने आलेत. त्यावेळी एकाने धारदार हत्यार चालवले तर दुसऱ्याने थेट मित्रावर तीन राऊंड फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये एकजण जागीच ठार (Died) झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

रोहन येवले (Rohan Yewale) (वय 21, रा. आढले खुर्द, मावळ) असं खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (Avinash Bhoir) (23, रा. आढले खुर्द, मावळ) असं गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी की, संशयीत आरोपी अविनाश भोईर आणि मृत रोहन येवले हे एकाच गावातील चांगले मित्र होते. तर, दोन दिवसांपुर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. त्यावेळी रोहनने अविनाशवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. अविनाश यानेही रोहनवर 3 राऊंड फायर केले. यात जखमी झालेल्या रोहनला सोमाटने फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, उपचाराआगोदरच त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या घटनेबाबत महिती समजताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Branch Squads) घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अविनाश यांच्यावर हिंजवडी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यात वाद का झाला? हे अस्पष्ट आहे.
काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात आणि रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
याप्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलीस (Shirgaon Police) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | one dies in an argument between two friends firing in maval pimpri chinchwad police on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुड परिसरातील घटना

 

Lata Mangeshkar | ‘स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा’; मंगेशकर कुटुंबीयांनी केलं आवाहन

 

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज