Pune Crime | पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, मंगेश गोळे यांच्यावर कोट्यवधीच्या फसवणुकीचा गुन्हा; जाणून घ्या प्रकरण

पुणे : Pune Crime | देणेकर्‍यांचा तगदा टाळण्यासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर (Businessman Gautam Pashankar) यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी (Kharadi) येथील यिनयांग प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर बँकेकडून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक (Pune Crime) करण्यात आली आहे.

याप्रकरणी गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रोड), मंगेश अनंतराव गोळे Mangesh
Anantrao Gole (रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय ६१, रा. वडनेर, ता. मालेगाव, जि़ नाशिक) यांनी चंदननगर
पोलिसांकडे (Chandan nagar Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पाषाणकर व मंगेश गोळे हे प्रॉक्सिमा क्रिएशन चे भागीदार आहेत. त्यांनी खराडी येथील यिनयांग प्रोजेक्ट
येथील बिल्डिंग सी मधील फ्लॅट नंबर ९०२ हा ठाकोर यांनी १ कोटी ५६ लाख ६३ हजार ९८७ रुपयांना २०१५
मध्ये खरेदी केला होता. पाषाणकर व गोळे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे फ्लॅटचा ताबा दिला  नाही.

Pune Gang Rape | वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण : ‘त्या’  मुलीवर ठाण्यात आणखी एका तरूणाने केला अत्याचार

तसेच महिंदर परसराम मनसे (रा. गिता सोसायटी, कॅम्प) यांनी  फ्लॅट सी ८०२ हा ८१ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केला होता. या दोघांनाही फ्लॅटचा ताबा देण्यापूर्वी त्यांच्यावर व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था, सांगली यांच्याकडून २ कोटी रुपये कर्ज काढून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

खराडी येथील या प्रकल्पातील याच सी बिल्डिंगमधील  पी १०१ व १०२ हे फ्लॅटबाबत नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

 

हे देखील वाचा

Pune E-Bike | पर्यावरणपूरक इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर वाढविण्यासाठी महापालिकेचे धोरण अंतिम टप्प्यात; ‘ई-बाईक’ भाडेतत्वावर देण्यासाठी ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | one more cheating case registered on businessman gautam pashankar along with mangesh anantrao gole in chandan nagar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update