Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा (Online gambling den) सुरु केला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police station) ७ जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश कृष्णा कन्सारी (वय २९), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. माळशिरस), दीपक अशोककुमार सहा (वय २६), हरिशकुमार जी बैरागी (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा जुगार अड्डा चंद्रकुमार राकेश रुपवाणी (रा. रायपूर, छत्तीसगड) याच्या सांगण्यावरुन सुरु करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव भानुदास येलमार (PSI Mahadev Bhanudas Yelmar) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (७७३/२१) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

आरोपींनी हिंजवडी येथील फेज २ मधील हायमाऊट सोसायटीत (highmont society hinjewadi) फ्लॅट भाड्याने घेऊन सोसायटीच्या रहिवाशांना काहीही कल्पना न देता बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन चंद्रकुमार रुपवाणी याच्या सांगण्यावरुन ऑनलाईन बेटिंगचे (online betting) काम सुरु केले होते. या ऑनलाईन जुगार अड्ड्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता छापा (Pune Crime) टाकला. तेव्हा तेथे असलेल्यांनी त्यांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी या फ्लॅटमधून १८ मोबाईल, २ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर असा ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत.

 

Web Title :-Pune Crime | Online gambling den in rented flats in Pune! Pushback to raiding police; 7 arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा