Pune Crime | ऑनलाईन ऑर्डर पडली महागात, मागविले कपडे आल्या 5 पोती भरुन चिंध्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑनलाईन कपडे (Clothes) मागवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. रविवार पेठेतील (Raviwar Peth) एका व्यापार्‍याने (Merchant) ऑनलाईन कपड्यांची ऑर्डर पाठविली. मात्र, कपड्यांऐवजी त्यांना 5 पोती भरून कपड्याच्या फाटक्या चिंध्या मिळाल्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

याप्रकरणी रविवार पेठेतील एका 36 वर्षाच्या व्यापार्‍याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंजनी टेक्सटाईल्सचे मालक (Anjani Textiles Owner) हितेश कुमार बाबुलाल (Hitesh Kumar Babulal) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 21 ते 29 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुलाल यांनी कपडे विक्री करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी फोनवर संपर्क साधला.
त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांच्याकडून ऑर्डर घेतली. त्याचे 2 लाख 78 हजार 491 रुपये फिर्यादी यांनी त्यांच्या खात्यावर पाठविली. त्यांना ऑर्डरप्रमाणे कपड्यांचा माल न देता त्यांना 5 पोत्यांमध्ये कपड्याच्या फाटक्या चिंध्या पाठवून फिर्यादी यांची फसवणूक (Cheating) केली. पोलीस उपनिरीक्षक मोकाशी (PSI Mokashi) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Online order fell expensive ordered clothes arrived 5 bags full of rags

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा