Pune Crime | काय सांगता ! होय, इंदापूर तालुक्यात अफुची शेती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक (Intercrop) म्हणून अफू (Opium) या अंमली पदार्थांच्या काही झाडांची लगवड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यात (Indapur Taluka) बुधवारी (दि.2) उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक (Varakute Budruk) येथे हा प्रकर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 2 लाख 11 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पांडुरंग नामदेव कुंभार (Pandurang Namdev Kumbhar), नवनाथ गणपत शिंदे Navnath Ganpat Shinde (दोघे रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध अंमली औषधिद्रव्य व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कायद्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ (Police Constable Surendra Jaywant Wagh) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

बुधवारी कुंभार आणि शिंदे यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला ही अफूची झाडे भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अफूचे (खसखस) ओल्या झाडाचे व बोंडाचे एकूण वजन 32 किलोग्रॅम असून, अफूच्या बोडांसह झाडांची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 11 हजार 300 रुपये आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर (Police Inspector T.Y. Mujawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील (API Nagnath Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | opium cultivation unearthed in indapur taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Abhay Yojana Scheme | अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत 144.35 कोटींचा मिळकत कर जमा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी बंपर गुड न्यूज ! 31 मार्चपासून 90,000 रुपयांपर्यंत वाढेल सॅलरी, 3% वाढेल महागाई भत्ता

 

Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | 15 मार्च पासून पुणे महापालिकेचा कारभार ‘प्रशासका’च्या हाती