Pune Crime | कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यातून प्रेयसीला वगळण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील जिल्हा सत्र न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) खटल्याच्या सुनावणीत पतीच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल करता येत नाही, तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे खटल्यातून मला वगळावे असा बचाव प्रेयसीच्या वकिलांना केला होता. त्यानंतर पत्नीने पतीविरोधात दाखल केल्या खटल्यातून पतीच्या प्रेयसीला वगळण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी (Additional Sessions Judge S. S. Gosavi) यांनी दिले (Pune Crime) आहेत.

 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, टिना-अमित यांचे लग्न होऊन त्यांना दोन मुले आहेत. अमितचे लग्नापूर्वी किरणशी (सर्व नावावर बदलेली) प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाबाबत टिनाला ज्यावेळी समजले त्यानंतर पतीकडून तिला त्रास होऊ लागला. या त्रासला कंटाळून टिनाने हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत पती, सासरचे आणि किरण विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. दरम्यान किरणने या तक्रारीतून आपणाला वगळण्यासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला. पतीच्या मित्र-मैत्रिणींना किंवा प्रेयसीला प्रतिवादी करता येत नाही. असा उच्च न्यायालयाचा निकाल (High Court) असून टिना यांनी किरण आणि अमित यांचे प्रेमसंबंध असल्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

 

Web Title :- Pune Crime | order to exclude girlfriend in domestic violence case in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600% चा रिटर्न; जाणून घ्या पुढे सुद्धा राहणार का तेजी?

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान (व्हिडीओ)

Pune Mhada Lottery | घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी