Pune Crime | ऑनलाईन रेडवाईन मागवणे पडले महागात, पुण्यातील डॉक्टरची 3 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन (online) दारुची ऑर्डर (liquor Order) करणे पुण्यातील (Pune Crime) एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी (cyber thieves) डॉक्टरांच्या (doctor) बँक खात्यातून तीन लाख रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पुण्यातील (Pune Crime) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2021 पासून वेळोवेळी घडला आहे.

याप्रकरणी 71 वर्षीय डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन दोन अज्ञात मोबाईल धारकांवर फसवणूक (Fraud) आणि आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एप्रिलमध्ये शिवाजीनगर परिसरातील गुप्ता वाईन्स मधून रेडवाईन (Redwine) दारुची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी गुप्ता वाईन्सचे (Gupta Wines) मॅनेजर यांचा फोन नंबर मिळवला होता. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना वाईन्स देण्यासाठी क्यूआरकोड (QR Coad) पाठवून त्यांच्या बँक खात्यातून 3 लाख 16 हजार 168 रुपये ऑनलाई काढून घेतले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Ordering red wine online costly, doctor in Pune cheated of Rs 3 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rohit Pawar | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या ED चौकशीमागे कुणाचा हात?; पवारांनी केला गंभीर आरोप, म्हणाले…

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)