Pune Crime | उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् पुढं घडलं ‘असं’ काही; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर (Pune Crime) पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. पुण्यात (Pune Crime) प्रसिद्ध असलेल्या वास्तू, पेठांना अनेक लोक भेटी देत असतात. काही ठिकाणांची नावे माहित असल्याने उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी जातात. नवीन ठिकाणी गेल्यानंतर गोंधळलेल्या तरुणांना भामटे हेरुन त्यांना लुबाडतात. पुण्यात प्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेत (Budhwar peth) असाच एक प्रकार घडला आहे.

गावाकडून पुण्यात (Pune Crime) आलेला एकजण पुण्यातील बुधवार पेठेतील दाणी आळीतून जात होता. त्यावेळी एकाने त्याला जबरदस्तीने मिठी मारुन त्याच्या खिशातील 26 हजार रुपये चोरुन (Stealing) नेले. याप्रकरणी 45 वर्षाच्या गृहस्थाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे बीड जिल्ह्यातील (Beed district) आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे राहणारे आहेत.
ते शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीनच्या सुमारास बुधवार पेठेतील दाणी आळीमधून पायी जात होते.
तेथील नवीन बिल्डिंगसमोर आल्यानंतर आरोपी फिर्यादीजवळ आले.
त्यांनी गावाकडून आला आहे क? असे विचारत फिर्यादी यांचा हात पकडला.
जबरदस्तीने मिठी मारुन फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट व त्यामध्ये असलेले 26 हजार रुपये चोरुन नेले.
पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Out of curiosity, he went to see budhwar Peth in Pune and something happened next; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update