Pune Crime | …म्हणून पुण्यातील एका विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल 50 गोळ्या

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने (married women) चक्क थायरॉईडच्या 50 गोळ्या (thyroid pills) खाल्ल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडला आहे. याप्रकरणी महिलेने पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

 

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अमोल मारुती भंडारे Amol Maruti Bhandare (वय-37 रा. साने चौक, चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे (Home loan) आणि चारचाकी वाहनाचे कर्ज (four wheeler loan) फेडण्यासाठी पतीने विवाहितेकडे त्यांच्या आई वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरुन टोमणे मारुन शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच रात्री अपरात्री दारु पिऊन येऊन महिलेला मारहाण (Pune Crime) करुन उपाशी ठेवले. पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने गुरुवारी (दि.2) थायरॉईड आजाराच्या 50 गोळ्या खाल्ल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | over 50 thyroid pills taken married women in chikhali police station area due to husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

Ghulam Nabi Azad | नवीन पक्ष स्थापन करणार का? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं…