Pune Crime | मुलीला फोन करुन त्रास दिल्याबद्दल दोन मुलांसह पालकांना ठेवले डांबून; 1 लाख रुपयांचे मोबाईल चोरल्याचा कुटुंबावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | मुलीला सतत फोन करुन त्रास देत असल्याबद्दल (Girl Constantly Harassed By Two Boys Via Mobile Phone Calls) दोन मुलांना बोलावून त्यांना मारहाण करुन डांबुन ठेवून त्यांचे १ लाख रुपयांचे मोबाईल काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एका कुटुंबातील तिघांवर जबरी चोरीसह (Robbery) विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी वानवडीत (Wanwadi) राहणार्या ५१ वर्षाच्या नागरिकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना एनआयबीएम रोडवरील (NIBM Road, Pune) एका सोसायटीत २८ मार्च रोजी घडली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, फिर्यादींचा मित्र व त्यांचा मुलगा यांना एका कुटुंबाने घरी बोलावले. ते घरी गेल्यावर त्यांना तुमचा मुलगा माझ्या मुलीस सतत फोन करुन सतावत आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करुन चप्पलने मारहाण केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राचा १ लाख रुपयांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले (Pune Crime). तुमच्या मुलाने केलेल्या वर्तनाबाबत तुम्हाला भरपाई द्यावी लागेल व नाही दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली. त्यांना घरात ३ ते ४ तास डांबून ठेवले. या कुटुंबाने सातत्याने त्रास दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.