Pune Crime | कोंढव्यात गुंडांचा धुडगूस ! पार्क केलेल्या कार, दुचाकी, रिक्षांचा काचा फोडून माजवली दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपले वर्चस्व राखण्यासाठी रस्त्यावरील पार्क केलेल्या गाड्यांवर दगडफेक (Vehicle Vandalism) करुन त्याचे नुकसान करण्याचे लोण सध्या शहरात सर्वत्र पसरले आहे. कोंढव्यातील आश्रफनगर गल्लीत (Ashrafnagar, Kondhwa) दोघा गुंडांनी (Pune Criminals) धुडगूस घालून ८ गाड्यांची तोडफोड केली. (Pune Crime)

याप्रकरणी मोहम्मद शाहीद इलियास अन्सारी (वय ३२, रा. अश्रफनगर गल्ली क्रमांक ६, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७४/२२) दिली आहे. कोंढव्यातील आश्रफनगरमधील गल्ली क्रमांक ६ मध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोघे गुंड हातात कोयते घेऊन आले. त्यांनी गल्लीमधील रस्त्यांवर पार्क केलेल्या ४ चारचाकी, दोन रिक्षा व एक दुचाकी गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले (Pune Crime). परिसरात जोरजोरात ओरडून व हातातील कोयते हवंत भिरकावून दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तेथील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरुन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Parked cars, two wheelers, rickshaws shattered in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत; ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी होणार

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण