पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस (PMPML bus) जोरात आदळल्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्यात गॅप (spine Gap) पडल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. यानंतर या प्रवाशाने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) धाव घेत पीएमपी बस चालकाविरुद्ध (PMPML bus driver) तक्रार दाखल केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
अस्लम कादर शेख (Aslam Kadar Sheikh) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी राजु मोतीराम चिंचवडकर Raju Motiram Chinchwadkar (वय-62 रा. सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव खु) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज येथील सर्प उद्यानासमोर (Katraj Snake Park) 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू चिंचवडकर हे 27 नोव्हेंबर रोजी लोहगाव (Lohgaon) ते कात्रज (Katraj) या बसमधून प्रवास करत होते. बस कात्रज येथील सर्पोद्यानासमोर आली असता चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बस भरधाव वेगात चालवली. चालकाने समोर गतिरोधक असताना देखील ब्रेक न लावता तशीच बस नेली. यामुळे बस जोरात आदळली आणि फिर्यादी यांच्या मणक्यात गॅप पडला. या घटनेला चालक अस्लम शेख हा जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Passenger gap in PMPML bus collision in Pune, FIR against bus driver
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- New Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्या पगारात कपात?
- Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Jayant Patil on Pune Water Cut | पुण्यातील पाणी कपातीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)