Pune Crime | दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यु; अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव जाणार्‍या दुचाकीची धडक बसल्याने रस्ता ओलांडणार्‍या एका पादचार्‍याचा मृत्यु झाला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) दुचाकी चालविणार्‍या अल्पवयीन मुलासह दुचाकीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

कैलास वामन आठवले (वय ४८) असे मृत्यु पावलेल्या पादचार्‍यांचे नाव आहे. ही घटना लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटाकडे जाणार्‍या रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजता घडला होता. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

दुचाकी गाडी मालक बाळू नागवराव हिवत (वय ४२, रा. बाणेर) व १७ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय पांडुरंग आठवले (वय ३६, रा. खडकी बाजार) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०९/२२) दिली आहे.

 

बाळु हिवत यांची दुचाकी गाडी घेऊन एक १७ वर्षाचा मुलगा भरधाव लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटाकडे जाणार्‍या रोडवरुन जात होता. त्यावेळी कैलास आठवले हे रस्ता ओलांडत होते. दुचाकीने त्यांना धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.

 

१७ वर्षाच्या मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला वाहन चालविण्यास दिल्याने दुचाकी मालकाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pedestrian killed in two-wheeler collision; File a case against a two-wheeler owner with a minor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या चंदननगर परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; न्यायालयाच्या आदेशानुसार खूनाचा गुन्हा दाखल

 

Business Idea | ‘या’ फूलाच्या शेतीतून करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

 

Multibagger Stock | 4 रुपयांवरून 4000 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेअर, 1 लाखाचे झाले 10 कोटी रुपये