Pune Crime | 50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तु आणि हे मुल दोघेही अपशकुनी आहेस. तु या घरात आल्यापासूनच माझ्या मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन मगच या घरात परत ये असे म्हणत उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांनी 27 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे.

संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरे संजय ज्ञानोबा धावडे (Sanjay Gyanoba Dhavade), सासू माधवी संजय धावडे (Madhavi Sanjay Dhavade), पती मयुर संजय धावडे Mayur Sanjay Dhavade (सर्व रा. वसंत बंगला, लगड मळा, वडगाव खुर्द) यांच्यावर पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.

Court News | महिलेने पुरुषांबाबत केले असे ट्विट, संपूर्ण देशात उडाली खळबळ; कोर्टाने सुनावली 5 महिन्याची शिक्षा

पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, सहा वर्षांपूर्वी मयुर धावडे याच्याशी फिर्यादीचे लग्न झाले होते. लग्नात मुलीच्या वडीलांनी 100 तोळे सोने (Gold) व तब्बल 40 किलो चांदी (Silver) भेट म्हणून दिली. हा विवाह थाटामाटात झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर मयूर व्यसनाच्या आहारी गेला. त्यातून व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने मयुर यांची स्वतःची कंपनी तोट्यात गेली. त्यामुळे मयूरने पत्नीस अधिकच त्रास देणे सुरू केले.

समाजात बदनामी नको म्हणून पत्नी सर्व सहन करत होती. मुलगा झाल्याने काही दिवस त्रास कमी झाला.
मात्र त्यानंतर सासु, सासरे व पतीकडून छळ सुरू झाला. त्यांनी तु आणि तुझं मुल अपशकुनी आहे.
तु आल्यापासून मुलाचा व्यवसाय तोट्यात (Business loss) गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन आल्यानंतरच घरात परत ये असे म्हणत सासू सासऱ्यांनी महिलेला घराबाहेर काढले.
याला पतीनेही साथ दिली. सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे (API Pratibha Tandle) करीत आहेत.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Persecution of a 27 year old married woman in a highbrow family for Rs 50 lakh; FIR on husband with in laws

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update