Pune Crime | माहेराहून 100 तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ; आशिष ढोणेसह 6 जणांवर FIR

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime |माहेरच्यांकडे 100 तोळे सोन्याची (Gold) मागणी करत असल्याने सासरच्या लोकांनी विवाहीतेचा शारीरिक (Physical) आणि मानसिक (mental) छळ केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. सासरच्या छळाला वैतागून विवाहितेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) 6 जणांविरोधात फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

आशिष ढोणे Ashish Dhone (वय-33), निलीमा जाधव Nilima Jadhav (वय-35), रविराज जाधव Raviraj Jadhav (वय-38), तन्वी ढोणे (वय-32), रेखा ढोणे (वय-56), संग्राम ढोणे (वय-37 सर्व रा. अटल सोसायटी बिल्डींग, वसंत बाग चौक, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आशिष ढोणे यांचे नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन तू माहेरच्यांना 100 तोळे सोने आणि दोन फ्लॅटची (Flat) मागणी का करत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी पीडितेला हाताने मारहाण (Beating) करुन तिचा मानसिक आणि शारिकीक छळ केला. सासरच्या लोकांकडून सतत होणाऱ्या त्रासाला वैतागून विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस (Bibvewadi Police) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Persecution of a married woman for bringing 100 ounces of gold from Mahera; FIR against 6 persons including Ashish Dhone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 6,384 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मेसेज करुन तरुणीची कंपनीत बदनामी ; श्रेयक अग्रवालवर FIR

Pune Crime | बँकेत बॅलन्स नसताना दिला अडीच कोटीचा धनादेश; फसवणूक केल्या प्रकरणी एकावर FIR