Pune Crime | धक्कादायक ! अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं एका तरूणाने नैराश्यातून आत्महत्या (Suicide in Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  फलटण तालुक्याच्या गोखळी येथे गुरुवारी (3 फेब्रुवारी) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. नैराश्यातून संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितलं आहे. अतुल शिंदे (Atul Shinde) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी की, अतुल हा आपल्या कुटुंबियांसह पुण्यातील (Pune Crime) बारामती तालुक्याच्या गुणवडी येथील रहिवाशी होता. त्याला अभिनेता बनून चित्रपटात काम करायचं होतं. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्याला गॅरेजमध्ये काम करावं लागलं. त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान 1 फेब्रुवारीला अतुल बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी बारामती पोलीस ठाण्यात (Baramati Police Station) दिली होती.

 

दरम्यान, यानंतर गुरुवारी फलटण तालुक्यातील गोखळी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास बारामती पोलीस (Baramati Police) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | phaltan young man commits suicide due to depression baramati of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा