Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस (Pimpri Sands Haveli Taluka) येथील भीमा नदी किनाऱ्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.4) शीर, दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून छाटलेला मृतदेह (Dead Body) आढळून आला. रविवारी (दि.6) या शरीराचा व हाताचा भाग उरूळी कांचन (Uruli Kanchan) येथील जुन्या तांबेवस्ती जवळ एका ओढ्यात सापडल्याने खळबळ उडाली (Pune Crime) आहे. शरीराचा भाग या ठिकाणी सापडल्याने उरळी कांचन येथे खून (Murder in Pune) झाल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

 

संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड Santosh alias Popat Tukaram Gaikwad (वय-45 रा. भवरापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष यांचा मासेमारीचा व्यवसाय (Fishing Business) आहे. मंगळवारी (दि.1) दुपारी भवरापूर येथून बहिणीला भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे धड व हात-पाय छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास संतोष यांचे शीर व एका हाताचा भाग सापडला. याची माहिती स्थानिक लोकांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. (Pune Crime)

संतोष हे भीमा व मुळा-मुठा नदीवर अनेक वर्षापासून मासेमारी व्यवसाय करत होते.
त्यांचा अशा प्रकारे निर्घृण खून कोणी आणि कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अद्याप मृतदेहाचे एक हात व दोन्ही पाय गायब असल्याने खूनाचा तपासाचा उलगडा होणे बाकी आहे.
दरम्यान, या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station)
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale), लोणीकंद पोलीस ठाण्याचे (Lonikand Police Station)
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.के. पाटील (Police Inspector M.K. Patil),
लोणी काळभोरचे उपनिरीक्षक सदाशिव पाटील (PSI Sadashiv Patil) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | pieces of a dead body of man found near pimpri sandas uruli kanchan haveli taluka of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus

 

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर

 

NPS Calculator | तुमची गुंतवणूक होईल 1.33 कोटी रुपये, दरमहिना 26,758 रुपये मिळेल पेन्शन; जाणून घ्या किती गुंतवावे पैसे