Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांची कारवाई ! दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक; 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे. दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघां ओरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्या तिंघाकडून 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (3 जानेवारी) रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान केली आहे.

आकाश अनिल मिसाळ (Akash Anil Misal) (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (Rupesh Suresh Patil) (वय 30, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (Hrithik Dilip Tapkir) (वय 26, रा. पाषाण, पुणे) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच करण (Karan) आणि सनी (Sunny) (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे (Sagar Dnyandev Shedge) यांनी मंगळवारी (4जानेवारी) रोजी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी, वडमुखवाडी, चऱ्होली येथील कृष्ण पेट्रोल पंपाजवळ आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने तिंघाना अटक केली आहे. तर दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title : Pune Crime | pimpri chinchwad police arrested three in robbery case two pistols and two cartridges seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी