Pune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पुणे – मुंबई महामार्गावरील (Pune – Mumbai Highway) लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वैभव लॉज किवळे, रावेत (Pune Pimpri Crime) येथे करण्यात आली.

 

मोहम्मद बाशा शेख Mohammad Basha Sheikh (वय – 45 रा. एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे (PSI Vijay Laxman Kamble) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील वैभव लॉज (Vaibhav Lodge Kiwale) येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या पैशातून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत दोन हजार 30 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pimpri Chinchwad Police Bust Prostitution Racket Pune Mumbai Highway

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा