क्राईम स्टोरीपिंपरी-चिंचवडपुणे

Pune Crime | ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विक्री करण्यासाठी ब्राऊन शुगर (Brown Sugar) बाळगल्याप्रकरणी एका महिलेला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून 5 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 105 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर आणि विक्रीतून मिळालेले 2200 रुपये असा एकूण 5 लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात (Pune Crime) आला आहे. पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) माया दिलीप रणदिवे Maya Dilip Ranadive (वय-45) हिच्यावर एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील Police Naik Sandeep Gopichand Patil (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.11) पिंपरीतील आंबेडकर चौकाच्या पुढे असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ करण्यात आली आहे. पोलिसांनी माया दिलीप रणदिवे (वय-45 रा. भारत नगर, पिंपरी रेल्वे स्टेशनच्या (Pimpri Railway Station) बाजूला, पिंपरी) हिला अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील आंबेडकर चौकाच्या (Ambedkar Chowk Pimpri)
पुढे ओव्हर ब्रिजच्या खाली असलेल्या म्हसोबा मंदिराच्या ओट्यावर असलेल्या एक महिलेकडे ब्राऊन
शुगर असून ती विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून माया रणदिवे हिला ताब्यात घेतले.
तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे 5 लाख 25 हजार रुपये किमतीचे 105 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले.
तसेच ब्राऊन शुगर विक्रीतून मिळालेले 2200 रुपये जप्त केले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Pune Police Arrest Bogus Police Officer FIR In Lonikand Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

Back to top button