Pune Crime | ‘माझी वेळ आल्यावर दाखवतो, मी कोण आहे?’; तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी पोलीस आयुक्तालयासह (Pimpri Chinchwad Police) पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात राजरोजपणे राहत असलेल्या तडीपार गुंडाला (Tadipar Goons) पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला या गुंडाने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांशी धक्काबुक्की करुन त्याने ‘‘तुम्ही चूक करताय, माझी वेळ आल्यावर दाखवतो, मी कोण आहे,’’ अशी धमकी दिली. अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे या तडीपार गुंडाचे नाव असून पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलीस नाईक गणेश बाबासाहेब करपे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांनी अतुल पवार याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतून १९ जानेवारी २०२१ रोजी २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही या आदेशाचा भंग करुन तो पिंपरीगाव (Pimprigaon) येथील वैभवनगर येथे हातात कोयता घेऊन फिरत होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते. त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांशी धक्काबुक्की (Pune Crime) करुन त्यांच्या अंगावर येऊन, तुम्ही चूक करताय, माझी वेळ आल्यावर दाखवतो, मी कोण आहे, असे बोलून धमकी दिली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ठोंब तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pimpri Chinchwad Police News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा