Pune Crime | शेअर मार्केटमधील डब्बा ड्रेडींगवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ‘अ‍ॅक्शन’, 13 जणांवर गुन्हे दाखल करत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Share Market) डब्बा ट्रेडींग (dabba trading app) हा अवैध ट्रेडींगचा प्रकार मोठया प्रमाणावर चालु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (pimpri chinchwad cp krishna prakash) यांना मिळाली होती. त्यानंतर दरोडा विरोधी पथकाने वेगवेगळया ठिकाणी छापे टाकून तब्बल 13 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी 2 लाख 95 हजार 750 रूपयांचा माल जप्त (Pune Crime) केला आहे.

वासु खुशालदास बालाणी (51, रा. पिंपरी कॉलनी, पुणे), प्रकाश पासमल मनसुखानी (52, रा. शास्त्रीनगर, पिंपरी), रवी अच्युत गायकवाड (35, रा. खराळवाडी, पिंपरी), विकी सुरेश कांबळे (36, रा. बलदेवनगर, पिंपरी), रोशन सुरेश मखिजा (29, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी), सतिश दत्तात्रय खेडकर (35, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), राहुल मारूती कांबळे (48, रा. शास्त्रीनगर, पिंपरी),
रितेश अरूण गायकवाड (32, रा. तळेगाव दाभाडे), राजकुमार आवतराम कुंदनानी (45, रा. शगुन चौक, पिंपरी), गोविंद मोहनदास नथवानी (52, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी),
हरेश सेवकराम सचदेव (31, रा. अशोक टॉकीज जवळ, पिंपरी), जीतु सुरेश मखिजा (31, रा. वैष्णोदेवी मंदिरासमोर, पिंपरी) आणि जीतु शंकर वलेचा (24, रा. पिंपरी)
यांच्यावर दि. 14 ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरूघ्द पोलिस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि 15 मोबाईल फोन असा एकुण 2 लाख 95 हजार 750 रूपयाचा ऐज जप्त केला आहे.
आरोपी हे वेगवेगळया अ‍ॅपचा वापर करून विविध लोकांकडून ऑनलाइन पैसे लावून शेअरमार्केटमधील अंकाच्या चढउताराचा बेकायदेशीर,
विनापरवाना वापर करून डब्बा ट्रेडींग करत होते.
सदरील व्यवहारापोटी ते कोणत्याही डी मॅट अकाऊंटचा वापर करत नव्हते.
व्यवहारात मोठया प्रमाणावर ब्लॅक मनीचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा (Pimpri Police Station) दाखल केला असून त्याचा सखोल तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (cp krishna prakash) , अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde), उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole), सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Dr. Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, सहाय्यक निरीक्षक दिगंबर अतिग्रे (युनिट-1), सहाय्यक निरीक्षक सागर पानमंद (सायबर सेल), पोलिस अंमलदार राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रविण कांबळे, नितीन लोखंडे, आशिष बनकर, विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम (सर्वजण नेमणुक दरोडा पथक), अमित खानविलकर, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे (सर्वजण युनिट-1), अतुल लोखंडे, कृष्णा गवळी, जयश्री माळी, बिक्कड (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Pimpri-Chinchwad police take action against dabba trading in stock market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aspirin Side Effects | हार्ट अटॅक रोखण्याची ‘ही’ पद्धत जीवघेणी, एक्सपर्टने दिला इशारा

Pune Crime | MBA ची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर