Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला (Pune Crime) लागून असलेल्या आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध (sexual abuse teen girl) प्रस्थापित केले. मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक (arrest) केली आहे. हा प्रकार रुपीनगर आणि मोशी येथील लॉजवर 20 मार्च ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

विठ्ठल मंकाळ पवार Vitthal Mankal Pawar (वय-20 रा. सिद्धिविनायक सोसायटी, ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षाच्या पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.28) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोसह (Pocso Act) इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. यातून तिला रुपीनगर (Rupinagar) आणि एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या दुचाकीवरुन मुलीला मोशी (Moshi) येथील एका लॉजवर घेऊन (Pune Crime) गेला. त्याठिकाणी तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली.

मुलगी सहा महिन्याची गरोदर असताना तिच्या घरच्यांना संशय आला. त्यांनी मुलीकडे चैकशी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.
त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने (API Rakesh Gumane) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | pimpri chinchwad rape case news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Rules | 1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ 7 महत्वाचे नियम, सॅलरीपासून पेमेंट सिस्टममध्ये होईल बदल; जाणून घ्या होईल फायदा

Pune Crime | भिकारी आणि भंगारवाल्यामुळे खुनाचा उलगडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक 

Earn Money | घरबसल्या 2 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 1 लाख रुपयांपर्यंत कमाई; जाणून घ्या कशी?