Pune Crime | धक्कादायक ! रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिक्षा व्यवस्थित चालविण्यास सांगितल्याच्या रागातून महिला पोलिसासोबत (Lady Police) गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी महिला पोलिसाला रिक्षात ओढून त्यांचा विनयभंग (Molestation) केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Crime) मोशी येथील भारतमाता चौक (Bharatmata Chowk Moshi) येथे मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला.

 

विश्वदीप भरत मादलापुरे Vishwadeep Bharat Madlapure (वय-19), अभिषेक बाळासाहेब पोळ Abhishek Balasaheb Pol (वय-19), सुनिल शिवाजी कसबे Sunil Shivaji Kasbe (वय-20 तिघे रा. बनकर वस्ती, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी (दि.23) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवली. त्यावेळी फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याने आरोपींना रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. आरोपी पोलिसांचे न ऐकताच पुढे निघून गेले.

त्यानंतर भारत माता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबवली असता फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी त्याठिकाणी पोहचल्या. मी पोलीस आहे, रिक्षा व्यवस्थित चालवा असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांना रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळवून नेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सरकारी कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police | पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! बेजबाबदार व बेशिस्तीचे गैरवर्तन केल्याचा ठपका

 

Pune Crime | पुण्यातील ‘एरिया 37 क्लब’वर पोलिसांचा छापा ! रमनलाल पोरवाल, सुभाष टेकवानी, किशोर जैन, राकेश कोंढेला जुगार खेळताना पकडलं; हॉटेल सुपरवायझर सुनिल मुंदडा, यतिन शहासह 6 जणांविरूध्द FIR, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले – ‘…पण दोन हात करायची वेळ आली तर कमी पडणार नाही’