Pune Crime | कार-मोटारसायकल अपघातातील वादातून थेट काढले पिस्तुल; कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील घटनेत खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कार मोटारसायकल यांच्यात एकमेकाला साईड देण्यावरुन किरकोळ वाद (Dispute) झाला. तेव्हा एकाने थेट पिस्तुल (Pistol) काढून तरुणाच्या छातीवर रोखून धरल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt to Murder) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत परस्पर विराेधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

याप्रकरणी सागर गुलाब शिंदे Sagar Gulab Shinde (वय 26, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गजेंद्र अशोक हगवणे Gajendra Ashok Hagwane (रा. किरकटवाडी, सिंहगड रोड-Sinhagad Road) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उजवी भुसारी कॉलनीतील हनुमान मंदिराच्या पुढे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.(Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समोरुन येणार्‍या आरोपीच्या गाडीला धडक दिली. या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी सागर हा घरासमोर आला. त्यांच्या नातेवाईकांना फोन लावत असताना आरोपी गजेंद्र तेथे आला व त्याने फिर्यादीचे हातातील मोबाईल हिसकावून घेऊन तो खाली आपटून त्याचे नुकसान केले. फिर्यादी यांना हाताने मारहाण (Beating) करीत असताना खाली पाडले. त्याच्याकडील पिस्टल काढून फिर्यादीच्या छातीवर बसून त्याच्या दिशेने रोखून ‘‘थांब तुला खलासच करुन टाकतो,’’असे म्हणून त्याचे हातातील पिस्टल फिर्यादीवर रोखले. तेव्हा फिर्यादीने त्याचा हात वर उचलला असता त्याने पिस्टलचे मागील बाजूने फिर्यादीचे  तोंडावर मारुन त्यांना जखमी केले. फिर्यादीचे आईवडिल, भाऊ व बहिण तेथे आले. त्यांनी  फिर्यादीस सोडविण्याचा प्रयत्न केला असता गजेंद्र याने त्यांच्या दिशेने पिस्टल रोखून कोणी मधे आला तर याद राखा, असे म्हणून त्या सर्वांना धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी (PSI Kulkarni) तपास करीत आहेत.

 

साईड देण्यावरुन वादात कारची काच फोडून डोक्यात मारुन केले जखमी

याबाबत गजेंद्र हगवणे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर गुलाब शिंदे व नितीन गुलाब शिंदे Nitin Gulab Shinde (रा. उजवी भुसारी कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

गजेंद्र हगवणे हे मैत्रिण धनश्री हिला सोडण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्या चारचाकी वाहनासमोर आलेल्या
मोटारसायकल चालक सागर शिंदे याने साईड देण्याचे कारणावरुन वाद घातला.
त्यांच्या कारची पाठीमागील काच व डाव्या बाजूची पुढील काच फोडून नुकसान केले.
त्यांच्या मदतीला त्याचा भाऊ नितीन आला व त्याने हातातील कड्याने फिर्यादीच्या
डोक्यात मारुन गंभीर जखमी केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pistol fired directly from car-motorcycle accident dispute; Attempted murder case in Bhusari Colony in Kothrud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा