Pune Crime | पुणे महापालिकेच्या कचरा गाडीला मागून धडकून स्विफ्ट कार चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेचा कचरा साफाई करणारा ट्रक (pmc garbes van) रस्त्याच्या कडेची सफाई करत असताना भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारची पाठीमागून धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन स्विफ्ट कार चालकाचा मृत्यू (car driver Death) झाल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. हा अपघात पुण्यातील (Pune Crime) मुंढवा-घोरपडी रस्त्यावरील (Mundhwa-Ghorpadi road) कचरे वस्ती सुभाष घई बंगल्याजवळ (Near Subhash Ghai Bungalow) शुक्रवारी (दि.8) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.

प्रशांत जगन्नाथ भुजबळ Prashant Jagannath Bhujbal (वय-30 रा. सर्वे नं. 103 गांधी नगर, येरवडा, मुळ रा. मु.पो. कोंड, ता. जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या स्विफ्ट कार (Swift car) चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पालिकेचा रस्ता सफाई करणारा ट्रक (एमएच 12 क्यूडब्ल्यू 5210) सुभाष घई बंगल्याच्या समोरील रस्त्यावर सफाई करत पुढे चालला होता. त्यावेळी स्विफ्ट कार (एमएच 12 एऐक्स 3102) ही भरधाव वेगात येऊन ट्रकला पाठिमागून धडकली.

यामध्ये चालक प्रशांत भुजबळ हा गंभीर जखमी झाला. त्याला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. अपघात (Accident) झाला त्यावेळी कचरा ट्रक चालक अमोल कैलास गायकवाड (वय-28 रा. दत्तवाडी पुणे) हा ट्रक चालवत होता.
याप्रकरणी प्रशांत भुजबळ याच्या चुकीमुळे अपघात झाल्याने त्याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले (PSI Gajanan Bhosale) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | PMC garbes van accident one dead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

kareena kapoor | करिना कपूर- युवराज सिंगचे ‘एकत्रित’ फोटो साेशल मीडियावर व्हायरल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Ajit Pawar | अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध, म्हणाले – ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’