Pune Crime | पीएमपी बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी तरुणी बसमधून पडून जखमी, बस चालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पीएमपी बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधून प्रवास करणारी एक तरुणी बसमधून पडून गंभीर जखमी झाली आहे. तरुणी खाली पडल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना विश्रांतवाडी परिसरात घडली असून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

या प्रकरणी पीएमपी बस चालक (PMP Bus Driver) अर्जुन प्रभाकर मुंडे Arjun Prabhakar Munde (वय 25, रा. आळंदी-देहू फाटा) याच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा गंगाधर गायकवाड Meera Gangadhar Gaikwad (वय 29, रा. भैरवननगर, धानोरी) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. (Pune Crime)

 

मीरा गायकवाड ही तरुणी पीएमपी बसमधून प्रवास करत होती.
भरधाव वेगाने बस विश्रांतवाडी रस्त्याने निघाली होती. सावंत पेट्रोल पंपाजवळ बसचालक मुंढे याने अचानक ब्रेक दाबला.
त्या वेळी गायकवाडचा तोल गेला आणि ती बसमधून खाली पडली.
त्या वेळी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवाशांचाही तोल जाऊन त्या गायकवाडच्या अंगावर पडल्या.
गायकवाडच्या पायाला दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पीएमपी चालकाने भरधाव वेगाने बस चालविल्याने दुखापत झाल्याचे गायकवाडने फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिंगे तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | PMP bus driver suddenly presses brake, young passenger falls from bus injured, FIR against bus driver

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक