पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बस थांब्यावर उभी करण्यात आलेली बस हलवावी या कारणावरुन शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या (Shikrapur Police Station) वाहतूक पोलिसाने (Traffic Police) PMPML बस चालक व वाहकाला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालकांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी मारहाण (beating) केल्याचा आरोप चालकाने केला आहे. हा प्रकार (Pune Crime) रविवारी सायंकाळी शिक्रापूर येथे घडला आहे.
रमजान हुसेन पठाण Ramzan Hussain Pathan (वय-35 रा. वाघोली) असे चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पठाण हे वाघोली-कारेगाव ही बस घेऊन निघाले होते. शिक्रापूर बस थांब्यावर (Shikrapur bus stop) बस थांबवल्यानंतर प्रवासी चढले व उतरले. त्यावेळी त्या ठिकाणी रिक्षा उभ्या होत्या. रिक्षा चालकांनी पठाण यांना बस हलवण्यास सांगितले. यानंतर पठाण यांनी बस पुढे घेतली. (Pune Crime)
त्यानंतर रिक्षा चालक बस हलवावी असे सांगत होते. बस थांबा आहे वेळ झाल्यावर निघेल असे पठाण यांनी सांगितले.
त्यावेळी चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. त्यांनी वाहतूक पोलिसांना बोलावून घेतले.
वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांची बाजू घेत बस चालकाला बस हलवण्यास सांगितले.
मात्र, चालकाने वेळ झाल्यावर बस निघेल असे सांगितले पोलिसाने चालक आणि वाहक यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना मारहाण केली व चालकावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी चालकाला नोटिस बजावून शिरुर न्यायालयात (Shirur Court) हजर राहण्यास सांगितले.
Web Title :- Pune Crime | pmpl bus driver traffic police beating crime
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर