Pune Crime | कुमठेकर रोडवर PMPML बसचा ब्रेक फेल ! 7 ते 8 वाहनांना धडक; 2 ते 3 जण जखमी (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील कुमठेकर रोडवर (Kumthekar Road) आज दुपारी एका पीएमपीएमल बसचा ब्रेक फेल (PMPML Bus Break Fail) झाल्याने मोठा अपघात (Accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसून दोन ते तीन जण जखमी (Injured) झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या अपघातामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jams) झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला (Pune Crime) जात आहे. (Pune Accident News)

 

पीएमपीएमलची बस (एमएच 12 एचबी 5036) हडपसरच्या (Hadapsar) दिशेने जात होती. कुमठेकर रोडवर अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे गाडीने 7 ते 8 वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 2 ते 3 जण जखमी झाले आहेत. गजबजलेल्या रस्त्यावर अचानक अपघात झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (Pune Crime)

 

 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या कडेला असलेली भिंत आणि बस यांच्यामध्ये एक रिक्षा अडकली. यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | PMPML bus brakes fail on Kumthekar Road! Hit 7 to 8 vehicles; 2 to 3 injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा