क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | कात्रज बायपासजवळ स्वारगेट डेपोतील PMPML चालकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, खूनाचा FIR दाखल

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime |पुण्यात (Pune) एका पीएमपीएमएल (PMPML) बस चालकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बस चालकाचा मृतदेह हांडेवाडी-कात्रज बायपाय (Katraj Bypass) याठिकाणी आढळून आला आहे. गौतम मच्छिंद्र साळुंखे Gautam Machhindra Salunkhe (रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या चालकाचे नाव आहे. साळुंखे हे स्वारगेट (Swargate) डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, नजीकच्या पोलीस ठाण्यात (Police Station) अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे यांनी शनिवारी (दि.10) स्वारगेट ते धायरी या मार्गावर ड्युटी केली. ड्युटी संपल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास बस डेपोमध्ये जमा केली. त्यानंतर त्यांचा आज सकाळी कात्रज बायपास या ठिकाणी मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नजीकच्या पोलीस ठाण्याचे (Police Station) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात
आला आहे. साळुंखे यांचा खुन कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी
आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हे देखील वाचा

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | PMPML bus driver’s body found near Katraj bypass, fir registered of murder in loni kalbhor police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Back to top button