Pune Crime | PMPML बसमध्ये चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; सहकारनगर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीला (Thieves Gang) बस चालकाच्या (PMPML Bus Driver) सतर्कतेमुळे पुण्यातील (Pune Crime) सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar police) बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.12) करण्यात आली.

 

अक्षय दत्ता जाधव (वय-22 रा. मुंढवा Mundhwa), राहुल इश्वर सिद्धपुर (वय-27 रा. मुंढवा), महिला आरोपी निला सचिन गायकवाड (वय-33 रा. मुंढवा मुळ रा. अंबरनाथ ठाणे (Ambernath Thane), नंदा महादेव गायकवाड (वय-37 रा. मुंढवा मुळ रा.सलगर वस्ती, सोलापूर Solapur) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शितल लहु पांगारकर Shital Lahu Pangarkar (वय-30 रा. धनकवडी Dhankawadi) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी शितल पांगारकर या शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास टिळक रोडवरील (Tilak Road) हिराबाग बस स्टॉप (Hirabag Bus Stop) ते बालाजीनगर (Balajinagar) असा कोथरुड बस डेपो (Kothrud Bus Depot) ते कात्रज (Katraj) या पीएमपीएमएल बसने (PMPML Bus) प्रवास करत होत्या. बस सातारा रोड (Satara Road) येथील शंकर महाराज मठाजवळ (Shankar Maharaj Math) आली असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करुन जबरदस्तीने गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे मंगळसुत्र आणि पर्समधील 4500 रुपये चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी व बसमधील इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला.

प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून बस चालकाने बसची दोन्ही दारे बंद करुन बस सहकारनगर पोलीस ठाण्यात नेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तपास पथकाने (Investigation Team) बसमधील 50 ते 60 प्रवाशांचे ओळखपत्र पाहून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून फिर्यादी महिलेचे चोरलेले मंगळसुत्र आणि पैसे तसेच 4 महगाडे मोबाईल, 1 कटर, मोबाईल पीन असा एकूण 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai),
पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलानी (Police Inspector Yunus Mulani)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे (PSI Sudhir Ghadge), अनिल माने (Anil Mane),
पोलीस हवालदार बापु खुटवड, अमोल गुरव, सोपान नावडकर, पोलीस नाईक महादेव नाळे, भुजंग इंगळे,
सुशांत फरांदे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर, शिवा खेड,
महिला पोलीस हवालदार सुरेखा अनपट, मनीषा कारंडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | PMPML bus robbery gang nabbed; Materials seized from Sahakarnagar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAK PM Imran Khan | इम्रान खान यांचा तिसरा विवाह आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर ?

 

Tu Tevha Tashi | ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीचे 20 वर्षांनंतर पुनरागमन; नाव वाचून व्हाल…

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर