Pune Crime | पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश लक्ष्मण तोंडे Prathamesh Laxman Tonde (वय-20) याची पॉक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता (Innocent Freedom) केली आहे. आरोपी तोंडे याची आज (शुक्रवार) विशेष सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक (Special Sessions Judge Sunil Vedpathak) यांनी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली. (Pune Crime)

 

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली होती. पीडीत मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रथमेश तोंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम (I.P.C.) 354 (ड) (1) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन खडक पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले होते. (Pune Crime)

वकीलांचा न्यायालयात युक्तिवाद
सन 2019 मध्ये यातील पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 354ड व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु, यातील फिर्यादी व आरोपी हे आधीपासून एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत व त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांला विरोध असल्याकारणाने कुटुंबीयांच्या दबावाखाली सदरचा गुन्हा दाखल केल्याचे पुरावे आरोपीच्या वतीने ॲड विजयसिंह ठोंबरे व ॲड हितेश सोनार (Adv. Hitesh Sonar) यांनी न्यायालयासमोर सादर केले.

 

तसेच फिर्यादी व अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षीने सदरचा गुन्हा सिद्ध होत नसून याउलट आरोपी पक्षाने दिलेल्या पुराव्याने आरोपीस खोट्या गुन्ह्यात गुंतवले असल्याचे दिसून येत असल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याबाबत चा युक्तिवाद (Argument) आरोपीतर्फे सादर करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत विशेष सत्र न्यायाधीश अनील वेदपाठक यांनी आरोपी प्रथमेश तोंडे याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार व विष्णू होगे यांनी काम पाहिले.

 

Web Title :- Pune Crime | pocso accused acquitted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’

 

Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

 

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल