पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दोघा चोरट्यांनी पायी जात असताना तरुणाला अडवून गांजा (Ganja) विकतो का असे बोलून त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी दिनेश भागवत पवार (वय ३२, रा. केळगाव, आळंदी – Alandi) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७८/२२) दिली आहे. पोलिसांनी राहुल बाबु रिटे (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर -Shivaji Nagar Pune) याला अटक केली आहे. हा प्रकार पाटील इस्टेट (Patil Estate) पुलाखाली शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा आतेभाऊ हे पाटील इस्टेट पुलाखालून पायी जात असताना तेथे दुचाकीवर दोघे जण थांबले होते. त्यांच्यापैकी एकाने फिर्यादीला अडवून तू गांजा विकतो का असे बोलून शर्टच्या वरच्या खिशात हात घालून मोबाईल फोन व रोख रक्कम असा २० हजार ३०० रुपयांचा माल जबरदस्ती चोरला व ते दोघे दुचाकीवर बसून निघून गेले.
खडकी पोलिसांनी राहुल रिटे याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सोपे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Police Arrest Criminal Patil Estate Shivaji Nagar Pune Area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Boney Kapoor | ‘या’ कारणामुळे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरतात, बोनी कपूर यांनी सांगितले कारण
- Pune Crime | नगर रोडवर गुटखा वाहतूक करणार्या टेम्पोतून पावणे नऊ लाखांचा गुटखा जप्त
- Pune Crime | दारु पिताना झालेल्या वादातुन चुलत भावाचा खून, लोणी काळभोरच्या हद्दीतील घटना