Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 60 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 60 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम Prasanna alias Bala Manoj Kadam (वय – 21 रा. फ्लॅट नं. 302, तीसरा मजला, शांतीबन सोसायटी, शिवणे, ता. हवेली) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे.
प्रसन्न उर्फ बाळा कदम याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder),
गंभीर दुखापत करणे, दंगा, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 60 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta has so far taken action against 60 persons under the MPDA Act

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा