Pune Crime | पुण्यातील नगर रोडच्या एस. एस. टोळीच्या म्होरक्यासह 23 सदस्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उगारला आहे. पुण्यातील नगर रोडच्या एस. एस गँगचा (Pune S.S. Gang) स्वयंघोषीत म्होरक्या निखील देवानंद पाटील (Nikhil Devanand Patil) याच्यासह 23 साथिदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील (Pune Crime) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 68 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

एस. एस. गँगचा म्होरक्या निखील देवानंद पाटील, साथिदार नानासाहेब बाबुराव शिंदे, आशुतोष नानासाहेब शिंदे, शुभम रामचंद्र वाबळे, ऋग्वेद उर्फ छकुल्या जालिंदर वाळके, माऊली उर्फ केतन रामदास कोलते, ऋतिक महादु किनकर, अभिषेक रविंद्र गव्हाणे, प्रतिक अनिल कंद, ऋषीकेश सत्यवान आरगडे, शुभम उर्फ मोन्या अशोक भंडारे, आलोक महादेव सुर्यवंशी, अभिषेक भानुदास लंघे, ओंकार सुनिल इंगवले, गणेश अशोक भालेकर, अथर्व अंकुश कंद, गणेश रामकिसन राऊत, दिपक रंगु राठोड, रोहन रुषीकेश गायकवाड, रवि धोंडीराम चव्हाण, प्रतिक दिलीप तिजोरे, अक्षय बापुराव गिरीमकर, निलेश जितेंद्र काळे, निखिल नितीन जगताप यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(Pune Crime)

एस. एस. टोळी प्रमुख सचिन नानासाहेब शिंदे (Sachin Nanasaheb Shinde) याचा खुन (Murder) करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी निखील देवानंद पाटील याच्यासह त्याच्या साथीदारांनी 12 जानेवारी रोजी लोणीकंद भागात सायंकाळी सनी कुमार शिंदे (Sunny Kumar Shinde) व कुमार मारुती शिंदे (Kumar Maruti Shinde) यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून करुन लोणीकंद परिसरात दहशत माजवली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश तकटरे (Police Inspector Rajesh Taktare) यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांना सादर केला होता.
या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग (Yerawada Division) किशोर जाधव (ACP Kishore Jadhav) करीत आहेत.

आयुक्तांची 68 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 68 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार,
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार,
पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील (Police Inspector Maruti Patil), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरी (PSI Shrikant Temgiri) व सर्व्हेलन्स पथकातील (Surveillance Squad)
पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta s MCOCA action against 23 members of S S gang of Nagar Road Pune including the gang leader Nikhil Devanand Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा