Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 59 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 59 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे Khushal alias Dadya Santosh Shinde (वय – 22 रा राजगड चाळ, राजीव गांधीनगर, अपर बिबवेवाडी, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे. खुशाल उर्फ दाद्या शिंदे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Harsul Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

खुशाल उर्फ दाद्या शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीमध्ये कोयता, रॉड यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Criminals)

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खुशाल उर्फ दाद्या शिंदे याच्यावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Zaware), पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 59 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta takes action against 59 persons under MPDA Act

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा