Pune Crime | सराईत गुन्हेगार जाहेद गणी शेख उर्फ लंगडा टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa police station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी जाहेद गणी शेख उर्फ लंगडा टोळीच्या (Jahed Gani Sheikh alias Langada) म्होरक्यासह 8 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 71 आणि चालु वर्षात 8 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख जाहेद गणी शेख उर्फ लंगडा (वय-25 रा. गल्ली नं.8, हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद, पुणे, वसिम उर्फ लाला रशिद हजारी (वय-38 रा. सारा अपार्टमेंट, साईबाबानगर, कोंढवा खुर्द), सोहेल ईनामुल शेख (वय-23 रा.भैरवनाथ मंदिराच्या मागे, कोंढवा खुर्द), रुहान खैरुद्दीन तांचारम्बण (वय-19 रा. मिठानगर, कोंढवा), वाहिद उर्फ शाहरुख रिजाय बागवान (वय-26 रा. साईबाबा नगर, कोंढवा खुर्द), अजय राजकुमार ढगे उर्फ गोपी (वय-22 रा. सैलानी नगर, नांदेड), मोसीन मोहम्मद रफी कुरेशी (वय-30 रा. भिमपुरा, पुणे), अजहर रहिमोउद्दीन शेख उर्फ बांगा (वय-26 रा. सादतनगर, नांदेड) आणि 17 वर्षाचा विधीसंघर्षीत बालक यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

आरोपींनी कोंढवा पोलीस स्टेशन, वानवडी (Wanwadi Park Police Station), कोरेगांव पार्क (Koregaon Park Police Station), खडक (Khadak Police Station) तसेच औरंगाबाद (Aurangabad) व नांदेड (Nanded) जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व परिसरात दहशत पसरवण्यासाठी लोकांना दमदाटी करणे, खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder,), जबरी चोरी (Robbery), दरोडा, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे अशी गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर आतापर्यंत 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पटेल (Senior Police Inspector Sardar Patel) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्तांची 71 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 71 तर चालु वर्षात 8 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar),
गोकुळ राऊत (Gokul Raut),
सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (Anil Survase),
पोलीस अंमलदार जगदिश पाटील, राजेंद्र ननावरे, जगदिश पाटील,
रुपनवर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s mcoca mokka action against criminal Jahid Gani Sheikh alias Langada gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा