Pune Crime | दहशत पसरवणाऱ्या सार्थक मिसाळ गँगवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सार्थक मिसाळ गँगच्या (Sarthak Misal Gang) म्होरक्यासह 8 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई (Pune Crime) केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 53 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख सार्थक संगित मिसाळ sarthak sangit misal (वय-20 रा. मानाजी नगर, नऱ्हेगाव, पुणे), अजय उर्फ शुभम रविंद्र हिरे (वय-23 रा. जांभळे हाईट्स, आंबेगाव खुर्द) यांना 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. तर तुकाराम रामचंद्र येनपुरे उर्फ वस्ताद (वय-52 रा. लिपाणे वस्ते, आंबेगाव खुर्द), तुषार प्रकाश डोंबे (वय-21 रा. जांभळवाडी रोड, पुणे), लकि उर्फ लखन अरुण गायकवाड (वय-19 रा. जैन मैदिर, कात्रज), तेजस उर्फ बंटी तुकाराम येनपुरे (वय-20 रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव खुर्द), आदित्य उर्फ बबलु जगमोहन सिंन्हा (वय-19 रा. दत्तनगर, आंबेगाव खुर्द), कल्पेश अनिल चव्हाण (वय-32 रा. दत्तनगर आंबेगाव खुर्द) यांना 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

सार्थक मिसाळ टोळीवर 2020 पासून संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे शिरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
या टोळीची परिसरात दहशत रहावी यासाठी जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे असे कृत्ये सातत्याने सुरु ठेवली होती.
या टोळतील अनेकांवर हद्दपार व स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.
मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. 22 ऑगस्ट रोजी या टोळीने जुन्या भांडणाच्या रागातून आकाश पवार (वय-24 रा. आंबेगाव बुद्रुक) याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti University Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar), यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde) यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करुन पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of Police Rajendra Dahale) मंजूरी दिली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) करीत आहेत.

 

आयुक्तांची 53 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 53 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव, विजय पुराणीक, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावडे, पोलीस अंमलदार कृष्णा बढे, चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, अमित शेडगे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s ‘Mocca’ action against Sarthak Misal Gang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murder in Pune | पुण्यात कोयत्याने सपासप वार करुन चिकन दुकानदाराचा खून; बोपोडी परिसरातील घटना

SBI नं पेन्शनधारकांसाठी केलं ‘हे’ मोठं काम, पेन्शनसंबंधीत सर्व सर्व्हिस होणार सोप्या, जाणून घ्या

CNG-PNG Prices | सर्वसामान्यांना पुन्हा बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 % वाढू शकतात CNG चे दर