Pune Crime | भेसळयुक्त ताडी विक्री व लागणारे साहित्य विक्री करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या आणि ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची पुणे शहरात (Pune Crime) विक्री करणाऱ्या 4 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 51 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख प्रल्हाद उर्फ परंश रंगनाथ भंडारी (रा. पीडीसी बँक मागे, केशवनगर, मुंढवा), ताडी बनवण्यासाठी लागणेरे साहित्य विक्री करणारा निलेश विलास बांगर (रा. कुरकुटे वस्ती, पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), ताडी विक्रेता सुनिल गंगाराम बनसोडे (वय-20 रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे), शाहरुख युसुफ मनसुरी (वय-25 रा. इंदिरानगर, लोणी काळभोर) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (anti narcotics cell, pune) दोनच्या पोलिसांनी
24 ऑगस्ट रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या (Lonikalbhor police station)
हद्दीत भेसळयुक्त ताडीची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती.
या कारवाईत सुनिल बनसोडे याच्याकडून तब्बल 265 लिटर रासायनिक विषारी ताडी व ताडी बनवण्याचे विषारी रसायन क्लोरलहाईड्रेट (CH), सॅक्रीन, मड्डी पावडर, यीस्ट जप्त केले होते.
तपासामध्ये हा व्यवसाय शाहरुख मनसुरी याचा असल्या निष्पन्न झाले.
तसेच भेसळयुक्त ताडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य प्रल्हाद भंडारी याने
निलेश बांगर याच्याकडून होलसेल भावात खरेदी करुन ते मनसुर याला दिल्याचे उघड झाले.

आरोपी परंश भंडारी याच्याविरुद्ध पुणे शहर व जिल्ह्यात रासायनिक ताडीचे साहित्य पुरवल्या प्रकरणी 10 गुन्हे दाखल आहेत.
तर रासायनिक ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केल्या प्रकरणी निलेश बांगर याच्या विरोधात 7 गुन्हे दाखल आहेत.
तसेच निलेश हा वेळोवेळी वेगवेगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन रासायनिक ताडीची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
आरोपी सुनील बनसोडे आणि शाहरुख मनसुरी हे सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerawada Central Jail) आहेत.
तर टोळी प्रमुख परंश भंडारी हा देखील पोलीस कस्टडीत असून निलेश बांगर हा फरार आहे.

आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी लाखो लोकांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या घात परिणामांकडे दुर्लक्ष करुन रासायनिक बनावटीची ताडी तयार करुन त्याची विक्री करत आहेत.
तसेच रासायनिक ताडी तयार करण्यासाठी लागणआरे क्लोरोहाईड्रेड, सॅक्रीनची साठवणूक करुन त्याची विक्री करुन संघटित गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव अंमली पदाथ
विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad) यांनी पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण
(Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

 

आयुक्तांची 51 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 51 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve ), अपर पोलीस पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मागर्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस हवालदार देशपांडे, बोमादंडी, जाचक, खेवलकर यांच्या पथकाने केली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s ‘moccasin’ action against those selling adulterated palms and necessary materials

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | ‘पीएफ’वर 8.5 टक्के व्याजाची मिळाली मंजूरी, दिवाळीपूर्वी मिळू शकते रक्कम; जाणून घ्या

Skin Care Tips | लॅपटॉप आणि मोबाइलच्या अधिक वापरामुळे तुमच्या त्वचेचे होऊ शकते नुकसान, ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या

Post Office | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा होते कमाई, द्यावा लागत नाही टीडीएस; ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक, जाणून घ्या