Pune Crime | ऑमलेट नीट बनवता येत नाही म्हणून पुण्यातील पोलिस हवालदाराने दाबला गळा; खूनाचा प्रयत्न

पुणे : Pune Crime | पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधीत पोलिस हवालदारालाच भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

मनिष मदनसिंग गौड Manish Madansingh Gaud (50, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

मनिष गौड पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तर तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (दि. 19) ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑमलेट बनवले. बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे मनिष हा पत्नीवर ओरडला त्यांना तुला ऑमलेट निट बनवून देता येत नाही का ? म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धाऊन गेला. (Pune Crime) हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉनिक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

Web Title :-  Pune Crime | Police Havaldar Booked In Attempt To Murder Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ

Maharashtra IPS Transfer | मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांच्यातील मतभेदामुळे पदस्थापनेत 19 SP, डीसीपींना (DCP) फटका?, राज्य पोलीस दलात चर्चा

Pune Crime | चेंबर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू, वाघोली परीसरातील घटना

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’