Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गाडी पुढे कोणी न्यायच्या या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्‍याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी (Pune Crime) केले. हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील (Tarachand Hospital) रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला.

समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) रिक्षाचालक इलियास महम्मद शेख (वय ४४, रा. नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शेख व ब्रीजा कारचालक यांच्यात गाडी पुढे नेण्याच्या कारणावरुन ताराचंद हॉस्पिटलसमोरील रोडवर वाद झाला. तेव्हा शेख याने चारचाकी गाडीचे काचेवर हाताने मारुन नुकसान केले. पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे हे कर्तव्यावर तेथे पोहचले. पिंगळे यांनी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले असताना शेख फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले व त्यांच्या मांडीवर लाथ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Police officer beaten up in rickshaw-car driver dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन